Wardha Heatwave
वर्धा : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून उन्हाच्या तीव्रतेत वाढ होत आहे. मंगळवारी (दि.१४) वर्ध्यात कमाल तापमान ४३.०५ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. मध्यंतरी ढगाळ वातावरण तसेच अवकाळी पावसामुळे वातावरणात बदल झाला होता.
मात्र, मागील तीन ते चार दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. दिवसभर उष्ण व कोरडे वारे वाहत असल्याने नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे. दुपारच्या वेळेत शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठा आणि चौकातील वर्दळ कमी झालेली दिसून येते.
कडक उन्हामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर पडणे टाळल्याचे चित्र पाहायला मिळाले. मंगळवारी ४३.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दिवसभर उन्हाची तीव्रता होती. दरम्यान, वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने नागरिकांना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.