वर्धा : लायसन्स, कागदपत्र नसलेले, कर्णकर्कश सायलेंसरच्या बुलेट जप्त करत कारवाई करण्यात आली. यावेळी ३४ वाहने जप्त करण्यात आली. ही कारवाई वाहतूक नियंत्रण शाखेने केली.
वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या आदेशावरून बजाज चौकात अचानक नाकाबंदी मोहीम राबवली. यावेळी संशयित मोटार सायकली वाहने तपासणी करीत असताना ७ ऑटो रिक्षा, २२ मोटारसायकल ज्यांच्याकडे ड्रायव्हिंग लायसेन्स, गाडीचे मूळ कागदपत्र सोबत नव्हते तसे ज्यांनी शासनाचा दंड भरपूर प्रलंबित ठेवलेला होता, त्याशिवाय कर्णकर्कश सायलेन्सर लावलेल्या ५ बुलेट अशी ३४ वाहने जप्त करण्यात आली.
वाहतूक नियंत्रण शाखा यांनी बजाज चौकात अचानक नाकाबंदी करून त्यात वाहने, मोटार सायकल यांची तपासणी करून संशयित कागदपत्र नसलेली वाहने ही जप्त केली. वाहन चालविताना वाहनाची कागदपत्र, ड्राइव्हिंग लायसेन्स सोबत बाळगावे, वाहन चालवीतना मोबाईलवर बोलू नयेत, आपल्या वाहनावरील दंड लवकर भरावे, वाहतूक नियमांचे पालन करावे असे आवाहन वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.