Leopard falls in well Arvi
वर्धा : शेतातील विहिरीत बिबट्याचा शेतशिवारातील विहिरीत पडून मृत्यू झाला. शिकारीचा पाठलाग करताना बिबट विहिरीत पडून मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. ही घटना आर्वी तालुक्यातील टाकरखेडा शिवारामध्ये उघडकीस आली.
आर्वी तालुक्यातील टाकरखेडा शिवारामध्ये शेतातील विहिरीत बिबट असल्याचे आढळून आले. शेतमालकाने तातडीने याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. वनविभागाचे अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. विहिरीमध्ये बिबट तसेच रानडुक्कर आढळून आले. वनविभागाच्या चमूने विहिरीतून बिबट तसेच रानडुक्कर बाहेर काढून शवविच्छेदन करण्यात आले.
पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बिबटाचे शवविच्छेदन केले. मृत बिबट्या जवळपास पाच ते सहा वर्षांचा असल्याचे सांगण्यात येते. शवविच्छेदनानंतर बिबट्याला अग्नी देण्यात आला. सहाय्यक वनसंरक्षक माधव आडे यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश गवारले, क्षेत्र सहाय्यक उमेश शिरपूरकर, विनोद आडे, लीलाधर मून, सुनंदा उईके, अमोल टेंभरे, तुकाराम गारोळे, चंद्रशेखर निघोट, साबळे, चव्हाण तसेच वन विभागाचे कर्मचाऱ्यांनी याबाबतची प्रक्रिया पार पाडली.
विहिरीमध्ये बिबट तसेच रानडुक्कर आढळून आले. दोन दिवसापूर्वी बिबट विहिरीत पडला असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. विहिरीत रानडुक्कर आढळल्याने पाठलाग करताना बिबट विहिरीत पडला असावा, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.