वर्धा

Wardha Crime : धक्कादायक! वर्ध्यात संशयित चोराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर चाकूने प्राणघातक हल्ला

हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारी जखमी

पुढारी वृत्तसेवा

वर्धा : दुचाकी चोरी प्रकरणातील संशयित आरोपीला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर आरोपीने चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची थरारक घटना समोर आली आहे. ही घटना समुद्रपूर तालुक्यातील रेणकापूर येथे घडली. या हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले असून, त्यांना तातडीने सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे समुद्रपूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी प्रकाश मैंद आणि रोशन उईके हे दुचाकी चोरीतील संशयित आरोपी प्रशांत मेंढे याला ताब्यात घेण्यासाठी रेणकापूर येथे गेले होते. त्यावेळी आरोपी प्रशांत मेंढे याने अचानक पोलीस कर्मचारी प्रकाश मैंद यांच्यावर झडप घालून त्यांच्या गळ्यावर धारदार चाकूने वार केले. आपल्या सहकाऱ्याला वाचवण्यासाठी रोशन उईके धावून आले असता, झटापटीत तेही जखमी झाले.

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही जखमी कर्मचाऱ्यांना उपचारासाठी सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी समुद्रपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपी प्रशांत मेंढे याला अटक करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT