वर्धा : नागपूर मार्गावर वर्ध्यालगत शेळ्या घेऊन जाणारा ट्रक अनियंत्रित होऊन पलटी झाल्याने दोन जण ठार झाले. या अपघातात ४० शेळ्यांचा मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी (दि.18) रात्री दीड वाजताच्या सुमारास घडला. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळ जिल्ह्यातील जोडमोहा येथून ११४ शेळ्या भरून ट्रक रामटेक येथील शेळीमेंढी विकास केंद्रात जात होता. वर्धा - नागपूर मार्गावर वर्धालगत चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक अनियंत्रीत होऊन पलटी झाला. त्यात श्यामा मारोती नेहारे आणि राजू हरी मेश्राम यांचा ट्रकखाली दबल्याने मृत्यू झाला. या अपघातात ४० शेळ्यांचा मृत्यू झाला.
चालक प्रशांत महादेव वालदे, शेळीमालक अंकुश अशोक ढोके, सुरेश चिंतामण राऊत हे तिघे जखमी झालेत. जखमींना रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. याप्रकरणी सेवाग्राम पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अपघाताची माहिती मिळताच ठाणेदार विनीत घागे यांच्यासह सहायक पोलिस निरीक्षक दिलीप कडू, मनोज लोहकरे, गजानन कठाणे, अजय वानखेडे, पोलिस उपनिरीक्षक चव्हाण, मारोती कापकर यांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. जखमींना बाहेर काढत रुग्णालयात दाखल केले. रात्रीच्या वेळी तातडीने जेसीबी बोलावून शेळ्या बाहेर काढण्यात आल्यात. पढेगाव येथील गोशाळेत पाठविण्यात आल्या. याप्रकरणी सेवाग्राम पोलिसांनी गुन्हा दाखल केला पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.