वर्धा : हातचलाखी करून लोकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या अट्टल गुन्हेगारास पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.
वडनेर येथील एकव्यक्ती वणा नागरी सहकारी बँक वडनेर येथे पैसे काढून ते पैसे मोजत होते. एक अनोळखी इसम त्यांच्याजवळ आला व त्यांचे पैसे मोजण्यास हाती घेऊन हातचलाखी करून फसवणूक केली. याप्रकरणी वडनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करीत होते. पोलिसांनी गोपनिय माहितीवरून नासिर अली आमीर अली (वय ४५, रा. माडा चौक, आजरी माजरी यशोधरा, जि. नागपूर) यास ताब्यात घेतले. त्यास विचारपूस केली असता आरोपीने सदरचा गुन्हा त्याचा साथीदारासह केल्याची माहिती पुढे आली. नासिर अली आमीर अली यास पुढील कारवाईकरीता वडनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलिस निरीक्षक विनोद चौधरी, पोलिस उपनिरीक्षक सलाम कुरेशी, शेखर डोंगरे, सचिन इंगोले, प्रमोद पिसे, रामकिसन इप्पर, विकास मुंडे, सुगम चौधरी, अरविंद इंगोले, राहुल अधवाल यांनी केली.