CM Short Term Course Scheme (Pudhari Photo)
वर्धा

CM Short Term Course Scheme | मुख्यमंत्री अल्पकालीन अभ्यासक्रम योजनेमध्ये पोलिस अधिकारी, कर्मचारी व पोलिस पाटील यांच्या पाल्यांचा, कुटुंबियांचा समावेश

Pankaj Bhoyar | गृह राज्यमंत्री डॉ. भोयर यांच्या संकल्पनेला यश, कौशल्य मंत्री लोढा यांनी दिले निर्देश

पुढारी वृत्तसेवा

Short Term Course for Police Families

वर्धा : सामान्य नागरिकांसोबतच शासनाच्या विविध विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना सोयी सुविधा देण्यासाठी राज्याचे गृह राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर सतत नवनव्या संकल्पना अंमलात आणत आहे. त्यांच्या प्रयत्नामुळे आता पोलिस विभागातील अधिकारी, कर्मचारी व पोलिस पाटील यांच्या कुटुंबीय, पाल्यांना मुख्यमंत्री अल्पकालीन अभ्याक्रमातंर्तत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमार्फत उद्योगासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण दिले जाणार आहे.

गृह राज्यमंत्री तथा वर्धा व भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी पोलिस विभागातील अधिकारी व कर्मचा-यांच्या कुटुंबियांच्या समस्या जाणून घेण्याचा उपक्रम संपूर्ण राज्यात सुरू केला आहे. या उपक्रमाची सर्वत्र स्तुती होत असताना आता त्यांनी पोलिस अधिकारी, कर्मचारी व पोलिस पाटलांच्या पाल्यांना रोजगारभिमुख शिक्षण देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. राज्याचे कौशल्य विकास, उद्योजकता व नाविण्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांना निवेदन देऊन मुख्यमंत्री अल्पकालीन अभ्याक्रम योजने मध्ये त्यांचा समावेश करण्याची मागणी केली होती.

या योजना कौशल्य विकास विभागाच्यावतीने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमार्फत चालविण्यात येत आहे. या योजनेत पोलिस अधिकारी, कर्मचारी व पोलिस पाटलांच्या पाल्यांचा समावेश करून त्यांना रोजगारभिमुख प्रशिक्षण दिल्यास त्यांची व्याप्ती वाढेल व स्वंयरोजगारसाठी मार्गदर्शन मिळेल यासाठी पुढाकार घेतला होता.

गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी मांडलेली संकल्पनेची कौशल्य, रोजगार, उदयोजकता विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी स्तुती करीत मुख्यमंत्री अल्पकालीन अभ्यासक्रम योजनेमध्ये पोलिस अधिकारी, कर्मचारी व पोलिस पाटीलांच्या पाल्यांचा समावेश केला आहे.शासकीय औद्योगिक संसथेचे प्राचार्य व निर्देशक संबंधित पोलिस आयुक्त,पोलिस अधीक्षक कार्यालय,पोलिस स्टेशन, एसडीपीओ कार्यालयाशी संपर्क करून योजनेची इंतभूत माहिती देतील. तसेच इच्छुकांची नाव नोंदणी करतील असे कळविले आहे.

या संदर्भात गृह विभागाकडून देखील संबंधितांना सूचना देण्यात याव्या, तसेच प्रत्येक पोलिस स्टेशन व महसूल विभाग निहाय एक समन्वयक नियुक्त करण्याची सूचना केली आहे. गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी मुख्यमंत्री अल्पकालीन अभ्याक्रम योजनेमध्ये पोलिस अधिकारी, कर्मचारी व पोलिस पाटील यांचे कुटुंबीय व पाल्यांचा समावेश केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कौशल्य, रोजगार मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे आभार मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT