सराफाकरून 13 लाख 43 हजारांचा ऐवज लंपास  Pudhari File Photo
वर्धा

वर्धा : सराफाकडून 13 लाख 43 हजारांचा ऐवज लंपास

पुढारी वृत्तसेवा

वर्धा, पुढारी वृत्तसेवा : वडनेर येथून सराफ दुकान बंद करून दुचाकीने घरी परतणाऱ्या सराफाला वणा नदीजवळ अज्ञात लुटारूंनी लुटल्याची घटना शुक्रवारी (दि.5) समोर आली आहे. यामध्ये सराफाकडे असणारी रोख रक्कम आणि सोने-चांदीचे आभूषण असलेली बॅग पळवली. व्यावसायिकाने प्रतिकार केला असता अज्ञात आरोपींनी त्यांच्या पायावर चाकूने वार करून जखमी केले. या पळवलेल्या बॅगमध्ये 13 लाख 43 हजार 960 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हिंगणघाट येथील सुभाष विनायक नागरे हे वडनेर येथील दुकान बंद करून दुचाकीने हिंगणघाटकडे परत येत होते. दरम्यान, वणा नदीच्या उड्डाण पुलाजवळ तोंडाला झाकलेल्या दोन लोकांनी त्यांना थांबवले. दरम्यान त्या दोघांनी त्यांच्या हातातली बॅग ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला प्रतिकार करून सुभाष नागरे यांनी कंपनीकडे धाव घेतली.

अज्ञातांनी त्यांचा पाठलाग केली आणि त्यांच्यामध्ये झटापटीत बॅग देण्यास नकार केल्यावर आरोपींनी धारदार शस्त्राने नागरे यांच्या पायावर वार करून जखमी केले. आणि अंधारातून अज्ञात लोक दुचाकीवरुन वर्धा मार्गाने पसार झाले. याबाबत सुभाष नागरे यांच्या तक्रारीवरून हिंगणघाट पोलिसांनी अज्ञात तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT