विदर्भ

अकोला : आरती दरम्यान कोसळले झाड; सात जणांचा मृत्यू

Shambhuraj Pachindre

अकोला; पुढारी वृत्तसेवा : जिल्हयात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. यामध्ये पारस येथे सभा मंडपावर झाड पडून ३० हून अधिक दबले. यात सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. प्रशासनाकडून तातडीने मदतकार्य पोहचवण्यात आले असून जखमींना अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे.

जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार, जिल्हयातील पारस येथील बाबूजी महाराज संस्थानमध्ये आरती सुरु असतांना रविवारी सायंकाळी झाड कोसळले. त्यामुळे सभामंडप तुटून पडला. याठिकाणी ५० पेक्षा जास्त भाविक उपस्थित होते. यापैकी सभामंडपाखाली ३० भाविक दबले. आकस्मिक घडलेल्या या घटनेनेनंतर एकच कल्लोळ उडाला. धावपळ सुरु झाली. घटनेची माहिती समजताच बाळापूर पोलिसांसह महसूल प्रशासनातील अधिकारी मदतीसाठी पोहचले.

रात्री उशिरापर्यंत मदतकार्य सुरु होते. जखमींवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह बाळापूरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आमदार रणधीर सावरकरांनी तत्परतेने घटनेबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना  माहिती दिली.मंत्री फडणवीस यांनी घटनेची ताबडतोब दखल घेऊन जिल्हा प्रशासन, विद्युत विभाग, महसूल विभाग व आरोग्य विभागाला सूचना दिल्या. मदतीच्या कार्याला गती देऊन भक्तांच्या निधनाबद्दल दुखःद संवेदना व्यक्त करून  मृतकाच्या वारसांना मदतीचा हात राज्य शासनामार्फत देण्यात येईल असे आश्वासन दिले.

घटनेत सात जणांचा मृत्यू 

या घटनेत सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. प्रशासनाकडून दबलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे नेमकी स्थिती सांगता येणार नाही अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे यांनी दिली.

हेही वाचा; 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT