अकोला: पुढारी वृत्तसेवा : राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी सातत्याने महापुरूषांचा अवमानकारक करत आहेत. याच्या निषेधार्थ वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने आज (दि. ११) अनोखे भीक मांगो आंदोलन करण्यात आले.
आज दुपारी स्थानिक फतेह चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह, गांधी चौक, ताजना पेठ, महोम्मद अली रोड अशा मार्गाने मार्केट मधून एक एक रुपया गोळा करून 'भाजप मानसोपचार फंड संकलित' केला. 289 रुपये जमा झालेली 'भीक' चंद्रकांत पाटील यांच्या उपचारासाठी ठाणे आणि नागपूर मेंटल हॉस्पिटला मनी ऑर्डर करण्यात आली. यावेळी फतेह चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह चौक, भाजप कार्यालय, गांधी मार्ग ते ताजना पेठ, पोलीस चौकी मार्गे पुन्हा फतेह चौक अशा मोर्चा काढण्यात आला.
हेही वाचा :