विदर्भ

केटरिंगच्या व्यवसायाखाली मानवी तस्करी; नागपुरातील रॅकेटचा भांडाफोड

अमृता चौगुले

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपुरात अंमली पदार्थ आणि तरुणींच्या तस्करीचं प्रकरण समोर आलं आहे. एका ऑडिओ कॉलवरुन पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळाली. नागपूरच्या रिंग रोडवर असलेल्या एका हॉटेल मालकासह दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. केटरिंगच्या व्यवसायाखाली मानवी तस्करी होत असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ओडिशा आणि देशाच्या इतर भागात केटरिंगच्या व्यवसायात सहभागी असणाऱ्या मुलींच्या माध्यमातून अंमली पदार्थाची तस्करी केली जात होती. या प्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

नागपुरात अंमली पदार्थ आणि तरुणींची तस्करी होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका ऑडिओ कॉलमुळे हा प्रकार समोर आला. नागपूरच्या रिंग रोडवर असलेल्या हॉटेल मालकासह दोन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर दुसऱ्या प्रकरणात तरुणींची तस्करी, विनयभंग आणि पॉक्सो कायद्याअंतर्गत पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. याही प्रकरणात केटरिंगच्या व्यवसायात असणाऱ्या मुलींना देह व्यापार करण्यास भाग पाडलं जात होतं.

या दोन्ही प्रकरणात आणखी आरोपी सहभागी आहेत. या आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. मात्र, नागपूर शहरात या दोन्ही प्रकरणावरुन शहरात खळबळ उडाली आहे. शहरात नक्की काय चाललंय असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

SCROLL FOR NEXT