विदर्भ

यवतमाळ जिल्ह्यात आढळले दहा कोरोना रुग्ण

अनुराधा कोरवी

यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा : यवतमाळ जिल्हात आज मंगळवारी (दि.४) रोजी कोरोनाचे दहा रुग्ण आढळून आले आहेत. यात ८ महिला तर २ पुरुषांचा समावेश आहे. सदर कोरोना रुग्ण बाभुळगाव -३, दिग्रस २, यवतमाळ २, नेर ३ या तालुक्यातील आहेत.

कोरोना रुग्ण वाढीच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय टास्क फोर्स समिती परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी त्रिसुत्रीचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.

जिल्ह्यत ४१९ कोविड चाचण्या केल्या असून त्यापैकी १० रुग्ण पॉझिटीव्ह आले आहेत. तर ४०९ नेगेटिव्ह रूग्ण आहेत. त्यामुळे जिल्ह्यात सक्रिय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १२ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ९ लाख ९६ हजार ९३० चाचण्या करण्यात आल्या असुन त्यापैकी ७९ हजार ७८६ रूग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. तर ९ लाख १७ हजार १४४ नेगेटिव्ह आहेत. तर १ हजार ८०४ रूग्णाचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT