अमरावती, पुढारी वृत्तसेवा : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या विदर्भ प्रदेशाध्यक्षपदी प्रा. मिलिंद रंगारी यांची निवड करण्यात आल्याची माहिती साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे यांनी दिली आहे. बोनस मिळणार आहे ( नाटक), झाडांची माती (काव्यसंग्रह), रूद्रावर वसुंधरेचे (नाटक), शिदोरी ( लेखमाला), घायाळ (नाटक), आकांत एक विषारी चक्र (नाटक), राजकारण (नाटक) वृध्दाश्रम (नाटक) ,पुण्याई आई बाबांची ( नाटक) असे रंगारी यांचे साहित्य प्रकाशित आहे.
प्रा. मिलिंद रंगारी हे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे विदर्भ सरचिटणीस म्हणून ते गेली दहा वर्षे कार्यरत होते. युवा मराठी साहित्य संमेलन, अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन, झाडीबोली साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषिवले आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न बैठकीत हि निवड करण्यात आली.
या वेळी साहित्य परिषदेचे नागपूर विभागीय अध्यक्ष सतीश सोमकुंवर, अमरावती विभागीय अध्यक्ष शिवा प्रधान विदर्भ महिला अध्यक्ष संगीता बांबोळे, नागपूर उपाध्यक्ष प्रा.किरण पेठे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष नीरज आत्राम, अमरावती जिल्हाध्यक्ष डॉ.नंदकिशोर पाटील, अकोला जिल्हाध्यक्ष राजकुमार भगत, वाशिम जिल्हाध्यक्ष प्रा..संजय धांडे, वर्धा जिल्हाध्यक्ष नरेंद्र गुल्हाणे,नागपूर उपाध्यक्ष नामदेव राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.