ताडकळस; पुढारी वृत्तसेवा : धानोरा काळे ते बानेगाव पाटी दरम्यान जमिनीचे भूसंपादन किंवा अधिकरण झालेले नाही. तरीही राज्य रस्ता २३५ असे नामांकन केले गेल्याच्या निषेधार्थ धानोरा काळे (ता. पूर्णा) येथील शेतकऱ्यांनी औरंगाबाद येथे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
रस्त्याचे भूसंपादन नसताना धानोरा काळे ते बानेगाव पाटी-माहेर पाटी रस्त्यापर्यंत १६ फुटांचा गाडी रस्ता आहे. त्याला राज्य रस्ता २३५ असे नामांकन केले आहे. या शेतातील कोणत्याही जमिनीचे भूसंपादन किंवा अधिकरण झालेले नाही, असे धानोरा काळे येथील शेतकऱ्यांनी सांगितले. याच्या निषेधार्थ विभागीय आयुक्त कार्यालयासमोर शेतकरी उपोषण करत आहेत. यामध्ये विष्णू मारोतराव काळे, जनार्दन दत्तराव काळे, चम्मच बाबुराव काळे, बाळासाहेब बापूराव काळे, उद्धव बाळासाहेब काळे, दत्ता ज्ञानोबा काळे, जगन्नाथ रंगनाथ काळे, साहेबराव शिंदे, उपसरपंच कैलास सोपानराव काळे, बाळासाहेब केरबाजी काळे, जनक प्रकाश काळे, मोतीराम माणिक काळे, भगवान विश्वनाथ कुलकर्णी यांच्यासह अन्य शेतकरी आहेत.
हेही वाचा :