विदर्भ

Nagpur Climbers: नागपूरच्या युवा गिर्यारोहकांची कमाल, यश शर्मा आणि दक्ष खंतेने सर केले पठालसू शिखर

अमृता चौगुले

नागपूर, पुढारी वृत्तसेवा: माउंट एव्हरेस्ट शिखर पहिल्यांदा सर केलेल्या दिवसाला आज २९ मे २०२३ ला ७० वर्षे पूर्ण होत आहेत. शेर्पा तेन्सिंग नोर्गे व सर एडमंड हिलरी यांनी २३ मे १९५३ रोजी पहिल्यांदा जगातील सर्वोच्च शिखर सर केले. हा दिवस जागतिक एव्हरेस्ट दिन म्हणून साजरा करण्यासाठी सामर्थ्य आणि दृढनिश्चयाच्या बळावर नागपूरचे तरुण गिर्यारोहक (Nagpur Climbers) यश शर्मा आणि दक्ष खंते यांनी २८ मे रोजी ४२०० मीटर उंचीचे पठालसू शिखर यशस्वीपणे सर केले. सोलांग व्हॅलीपासून ८ किमी अंतरावर आणि मनालीपासून २० किमी अंतरावर असलेले पठालसू शिखर, हिमाचल प्रदेशच्या कुल्लू व्हॅलीमध्ये असलेल्या उंच शिखरांपैकी एक आहे.

४२०० मीटर उंच पठालसू शिखर (Nagpur Climbers)

४२०० मीटर अर्थात 13,800 फूट उंचीवर असलेल्या बलाढ्य पठालसू शिखरावर चढत असताना, दाट पाइन वृक्षांची जंगले, गवताळ कुरण, बर्फाच्छादित भूप्रदेश, बर्फाचे ठिपके आणि लँडस्केपसारख्या वाटणाऱ्या परंतु धोक्याच्या मार्गावरून मार्गक्रमण केल्याचे दक्ष खंते यांनी सांगितले. लवचिकता आणि कौशल्याची खऱ्या अर्थाने कसोटी लागली लागल्याचे तो म्हणाला. दिवसभरातील चढ-उतार, तापमानाचा सामना करताना चिकाटी दाखवणे महत्वाचे असते असे मत यश शर्माने व्यक्त केले. या साहसी मोहीमेचे महत्त्व असे की अल्पाइन पद्धतीने म्हणजेच कुठलीही बाह्य मदत् न घेता पार पडलेल्या या कामगिरीने नागपूर शहरातील साहसी खेळांच्या वाढत्या लोकप्रियतेवर पुन्हा एकदा प्रकाश टाकला आहे असे त्यांनी सांगितले.

यश शर्मा हे एक निपुण एन्ड्युरन्स प्रशिक्षक आणि प्रसिद्ध सायकल रेसर असुन त्यांनी यापूर्वी एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठला आहे. दक्ष खंते, सोमलवार निकलस हायस्कूलमधील बारावीचा विद्यार्थी आणि टायगर मॅन ट्रायथलॉनचा विजेता यानेही नेपाळ मधील एव्हरेस्ट (Nagpur Climbers) बेस कॅम्प गाठला आहे. सीएसी ऑलराउंडर अ‍ॅडव्हेंचर क्लबचे ज्येष्ठ गिर्यारोहक अजय गायकवाड आणि एव्हरेस्टर प्रणव बांडेबुचे यांचे या मोहिमेदरम्यान सहकार्य लाभले.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT