नागपूर : धरमपेठ परिसरात महागड्या विदेशी स्कॉच मद्य साठ्यासह ३७ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क विभागाने सिताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत धरमपेठ मुलींच्या शाळेजवळ ही कारवाई केली. महाराष्ट्रात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेला हा मद्याचा साठा हरियाणा राज्यातील आहे.
एका वाहनामधून मद्याचा साठा उतरविला जात असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली. याप्रकरणी वाहनाचा मालक निलय गडेकर याला अटक करण्यात आली असून आरोपीविरुद्ध मुंबई दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.