रवी शिवकुमार गुटलेवार Pudhari
नागपूर

Nagpur Crime | कामठीत होळीच्या रंगांत रक्ताचा सडा: 'गाडी बाजूला घे', म्हटल्याने तरुणाची हत्या

चौधरी हॉस्पिटल परिसरात ही हृदयद्रावक घटना

पुढारी वृत्तसेवा

Kamthi youth killed

नागपूर : ​ एकीकडे सर्वजण होळीच्या रंगात न्हाऊन निघत असताना, कामठी शहरात मात्र एका तरुणाच्या हत्येने गालबोट लागले. गाडी बाजूला घे, असे का म्हटले म्हणून झालेल्या वादात रक्ताचा सडा पहायला मिळाला. किरकोळ वादाचे रूपांतर थेट हत्येत झाल्याने परिसरात खळबळ माजली.

​मंगळवारी चौधरी हॉस्पिटल परिसरात ही हृदयद्रावक घटना घडली. रवी शिवकुमार गुटलेवार (वय ३०, रा. कामठी) हा तरुण आपल्या चारचाकी गाडीने जात असताना, त्याची अक्षयकुमार धनराज गेडाम (वय ३०) याच्याशी गाडी बाजूला घेण्यावरून बाचाबाची झाली. शब्दाने शब्द वाढत गेला आणि पाहता पाहता या वादाने रौद्र रूप धारण केले. संतापलेल्या अक्षयने रवीला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. या झटापटीत रवीचा तोल गेला आणि तो जमिनीवर जोरात आदळला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडला.

​घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी जखमी रवीला तातडीने उपजिल्हा रुग्णालय येथे हलवले. मात्र, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्याला नागपूरच्या मेयो रुग्णालयात पाठविले. मात्र डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतरही रवीची प्राणज्योत मालवली. विशेष म्हणजे, एक वर्षापूर्वीच रवीचा प्रेमविवाह झाला होता. संसाराची नवी स्वप्ने रंगवत असतानाच नियतीने डाव मोडला. त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत जुनी कामठी पोलिसांनी वेगाने तपास चक्रे फिरवली. मुख्य आरोपी अक्षयकुमार गेडाम याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT