Delhi CJP Protest Video Viral Pudhari
नागपूर

Delhi Protest Video | "मला मारा सर... मारा!" म्हणणाऱ्या नागपूरच्या आंदोलकाचा व्हिडिओ व्हायरल

जंतर-मंतरवरील आंदोलनात पोलिस कारवाईदरम्यान शांततेचा संदेश; गांधीवादी भूमिकेची सोशल मीडियावर चर्चा

पुढारी वृत्तसेवा

Delhi CJP Protest Video Viral

नागपूर : दिल्लीतील जंतर-मंतर येथे सोमवारी विविध सामाजिक व विद्यार्थी संघटनांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन केले. आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलकांना हटविण्याचा प्रयत्न केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. याचवेळी नागपूरहून आंदोलनात सहभागी झालेल्या एका आंदोलकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये संबंधित आंदोलक पोलिसांसमोर शांतपणे उभा राहून वारंवार "मला मारा सर... मारा!" असे म्हणताना दिसत आहे. पोलिसांच्या कारवाईदरम्यानही त्याने कोणताही आक्रमक किंवा हिंसक प्रतिसाद न देता शांततेचा मार्ग स्वीकारल्याचे दिसून येते.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित आंदोलक नागपूरहून आंदोलनातील मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी दिल्लीत आला होता. पोलिसांकडून आंदोलकांना हटविण्याची कारवाई सुरू असताना हा व्हिडिओ चित्रीत करण्यात आला. काही वेळातच तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

या व्हिडिओवर सोशल मीडियामध्ये विविध प्रतिक्रिया उमटत असून, अनेकांनी आंदोलकाच्या शांत, संयमी आणि अहिंसक भूमिकेचे कौतुक केले आहे. अनेक नेटकऱ्यांनी या कृतीला महात्मा गांधी यांच्या अहिंसात्मक आंदोलनाच्या तत्त्वांची आठवण करून देणारी भूमिका असे संबोधत त्याचे समर्थन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT