Vijay Wadettiwar On Trump Attack: काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार हे आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. मात्र त्यांच्या या वक्तव्यांमुळे स्वतः ते आणि काँग्रेस अनेकवेळा अडचणीत आले आहेत. आता वडेट्टीवार यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नाबाबतही वक्तव्य केलं आहे. मात्र त्यांच्या या वक्तव्यामुळं आता भाजपला ऐतं कोलीत मिळालं आहे.
विजय वडेट्टीवार यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रत्येक देशाला डिस्टर्ब केलं आहे. त्यामुळं अनेक दिवसांपासून त्यांच्यावर हल्ला होणार अशी स्थिती होती. यानंतर गाला डिनरवेळी गोळीबार झाला असून डोनाल्ड ट्रम्प, जेडी वॅन्स आणि फर्स्ट लेडी यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं.
यावर प्रतिक्रिया देताना वडेट्टीवार म्हणाले, जशी करणी तशी भरणी. त्यांनी जगातील प्रत्येक देशाला अस्वस्थ करून टाकलं होतं. त्यांनी अमेरिकेला स्वतःची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी अमेरिकेला बरबाद केलं.' त्यांनी इराणसोबत युद्ध सुरू केलं आणि त्यामुळं पश्चिम आशियातील सर्व देशांवर याचा परिणाम झाला.
वडेट्टीवार यांनी ट्रम्प यांच्याविरूद्ध लोकांमध्ये राग आहे. अशाच परिस्थिती भारतात देखील आहे. जरी आंदोलने होत नसली तरी लोकांमध्ये राग आहे. जसं आपल्या देशात होत आहे तसंच तिकडे देखील होत आहे. त्यामुळं हे होणारच होतं. भारतातील लोकांमध्ये त्याच प्रकारची भावना आहे.'
विजय वडेट्टीवार यांच्या या वक्तव्याची भाजपने दखल घेतली असून त्यावर कडक प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस देशात आंदोलने घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहे. आता हे काही लपून राहिलेलं नाही. नेपाळ, श्रीलंका आणि बांगलादेश स्टाईलनं भारतात देखील आंदोलन व्हावी असं त्यांना वाटतं, असं शेहजाद पूनावाला यांनी ट्वीट करून सांगितलं.
ते पुढे म्हणतात 'काँग्रेस नेत्यांची जसा अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला झाला तसा हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींवर देखील व्हावा अशी इच्छा आहे.;
शेहजाद पूनावाला यांनी 'जवळपास १५० पेक्षा जास्तवेळा त्यांनी अशी वक्तव्ये केली आहे. जोपर्यंत राहुल गांधी या वक्तव्याचा निषेध करत नाहीत तोपर्यंच हे वक्तव्य राहुल गांधींचे देखील आहे असं का मानण्यात येऊ नये. असा सवाल देखील केला.