Congress vs BJP Maharashtra
नागपूर: सत्ता मिळवण्यासाठी निष्ठावंतांना घरी आणि बाहेरच्यांना डोक्यावर बसवा असे भाजप पक्षाचे धोरण आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींना डावलून पक्ष प्रवेश होत असल्याने त्या पक्षात आता हुकूमशाही आलेली आहे. सत्तेसाठी चोर, बलात्कारी, खुनी, ईडी, सीबीआय मधील सगळे चालतात, सत्तेसाठी झपाटलेला पक्ष असल्याचा टोला काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी लगावला .
आज मुंबईत बैठकीत महापालिका निवडणुकांचा आढावा घेण्यात आला. स्थानिक परिस्थिती, उमेदवार याबाबत बैठकीत चर्चा झाली. स्थानिक पातळीवरील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भावना लक्षात घेऊन आघाडीचा निर्णय होईल असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले
आगामी महापालिका निवडणुकीत स्थानिक पातळीवर आघाडीचे निर्णय होणार असून शक्य तिथे स्वबळावर, शक्य तिथे आघाडी अशी काँग्रेसची भूमिका वडेट्टीवार यांनी स्पष्ट केली आहे. नाशिक येथे भाजप पक्षप्रवेशामुळे बिचाऱ्या आमदाराच्या डोळ्यात पाणी आले. भाजपला सत्तेसाठी चोर, बलात्कारी, खुनी, ईडी, सीबीआय मधील सगळे चालतात,अशी टीका त्यांनी यावेळी केली.