विजय वडेट्टीवार  File Photo
नागपूर

Vijay Wadettiwar|हिंदीसक्‍ती विरोधातील मोर्चा : दोन्ही ठाकरेंच्या निमंत्रण आल्यावर भूमिका स्‍पष्‍ट करु

काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांचे माध्यमांसमोर स्‍पष्‍टीकरण

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : दोन भाऊ राज्याच्या हिताच्या विषयासाठी एकत्र येत असतील. विशेषत मराठी वाचविण्यासाठी एकत्र येत असतील तर तर स्वागतच आहे. नियोजित मोर्चा संदर्भात आम्हाला निमंत्रण आल्यावर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू अर्थातच ती सकारात्मक असेल असे आज शुक्रवारी काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

महाराष्ट्रात हिंदीची सक्ती नको ही काँग्रेसची भूमिका आहे. आम्ही कुठल्याही परिस्थितीत हिंदीची सक्ती खपवून घेणार नाही. पहिली ते पाचवी हिंदी सक्ती नकोच. पाचवी नंतर तिसरी भाषा चालेल असेही यावेळी वडेट्टीवार म्हणाले. दरम्यान, लागलीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे बाळा नांदगावकर यांनी वडेट्टीवार यांना मोर्चासाठी निमंत्रण दिले. काँग्रेस नेत्यांशी चर्चेतून पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे वडेट्टीवार यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT