Vidarbha temperature crossing 45
नागपूर : एकीकडे नागपूरसह विदर्भात वादळी वारे, ढगाळ वातावरण यामुळे उकाडा वाढला असताना दुपारचे ऊन वैदर्भीयांची चांगलीच परीक्षा घेत आहे. शुक्रवारी (दि.१५) विदर्भातील अमरावती, अकोला, नागपूर, वर्धा चार जिल्ह्यांत पारा 45 अंश सेल्सिअस पलीकडे गेला आहे.
दुपारच्या वेळी रस्ते सुनसान दिसत असून महापालिकेने काही ठिकाणी चौकात सिग्नलववर ग्रीन नेट बांधले असले तरी भर दुपारी अनेक सिग्नल्सवर उभे राहताना नागपूरकर संताप व्यक्त करीत आहेत. महापालिकेच्या हिट ऍक्शन प्लॅननुसार वाहतूक सिग्नल्स भर दुपारी बंद ठेवण्याकडे दुर्लक्ष दिसत आहे. वाहतूक पोलिस देखील चालान कारवाईत गुंतलेले दिसत आहेत.
यावर्षी मे महिना तापमानाचा नवा विक्रम करण्याची शक्यता आहे. आज विदर्भात अमरावती येथे सर्वाधिक 45.6 अंश सेल्सियस तापमान होते. या खालोखाल वर्धा 45.5, अकोला 45.4 आणि नागपूरला 45 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.