Nagpur news | नागपूरात शासकीय रुग्णालयात दोन डॉक्टरच एकमेकांशी भिडले!

काहीकाळ रुग्णसेवा मात्र ठप्प : चौकशीसाठी समिती स्थापन           
Nagpur news
Nagpur news | नागपूरात शासकीय रुग्णालयात दोन डॉक्टरच एकमेकांशी भिडले Pudhari
Published on
Updated on

नागपूर - रुग्णसेवा योग्य नसल्याच्या कारणावरून अनेकदा रुग्णांचे नातेवाईक आणि डॉक्टर असा वाद नवा नाही. मात्र नागपुरातील शासकीय मेडिकल रुग्णालयात दोन डॉक्टर आपसात भिडल्याने काही काळ रुग्णसेवेला फटका बसला.

यासंदर्भात गोपनीयता बाळगली गेली असली तरी आता या घटनेच्या चौकशीसाठी मेडिकल प्रशासनाने समिती गठित केली आहे. क्ष-किरण विभागात झालेल्या या वादामुळे काही काळ रुग्णसेवा बंद ठेवण्यात आली. क्ष-किरणशास्त्र विभागात कार्यरत निवासी डॉक्टर क्षितिज यादव आणि शल्यक्रिया विभागातील निवासी डॉक्टर वैभव चौधरी यांच्यात लवकर रुग्ण तपासणी अहवालाच्या  कारणावरुन चांगलीच जुंपली.

या घटनेनंतर शल्यक्रिया विभागातोल काही निवासी डॉक्टर क्ष-किरणशास्त्र विभागात पोहोचल्याने हे प्रकरण चिघळले.  दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाली. त्यानंतर दुसऱ्या गटानेही   प्रत्युत्तर दिल्याने काही काळ तणाव वाढला. यात विभागातील काही सेवा कोलमडल्या. दरम्यान, रुग्णसेवेवर कोणताही परिणाम झाला नसल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाने केला.

घटनेच्या चौकशीसाठी मेडिकल प्रशासनाने समिती स्थापन केली असून विविध विभागांतील प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापकांचा समावेश आहे. संबंधित निवासी डॉक्टर आणि विभागप्रमुखांचे जबाब नोंदविण्यात आले. संबंधितांनी अधिक बोलण्यास नकार दिला. मात्र, एका अधिकाऱ्याने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर दोन निवासी डॉक्टरांच्या गटात वाद झाल्याची कबुली दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news