Vanchit Bahujan Aghadi Congress Nagpur Agitation Pudhari
नागपूर

VBA Congress Nagpur March | आरएसएस मुख्यालयावरील मोर्चावर वंचित, काँग्रेस ठाम: संविधान चौकात सभा

नागपूर येथील संघ मुख्यालयावर सोमवारी (दि.२३) "विशाल जन आक्रोश संयुक्त मोर्चा" काढला जाणार

पुढारी वृत्तसेवा

Nagpur RSS Headquarters Protest

नागपूर : वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात आरएसएसच्या नागपूर येथील संघ मुख्यालयावर सोमवारी (दि.२३) "विशाल जन आक्रोश संयुक्त मोर्चा" काढला जाणार आहे. टेकडी रोड पुढे मोर्चेकरी जाऊ नयेत यासाठी पोलिसांनी कंबर कसली असताना मोर्चेकरी मोर्चावर ठाम आहेत.

सध्या भर उन्हात संविधान चौकात जाहीर सभा सुरू असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ मार्गदर्शन करीत आहेत. काँग्रेसने या मोर्चाला समर्थन दिल्याने आवश्यक खबरदारी म्हणून पोलिसांनी संविधान चौक, टेकडी रोड परिसर संघ मुख्यालय रेशिमबाग, तसेच महाल, बडकस चौक परिसरात तगडा पोलिस बंदोबस्त, बॅरिकेड्स लावले आहेत.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, आम आदमी पार्टी, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे नेते यात सहभागी झाले आहेत.

भारत एक संविधानिक व्यवस्थेवर चालणारा देश आहे. पण एपस्टीन फाईलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव आल्यामुळे मोदींनी देशाचे सार्वभौमत्व हे अमेरिकेकडे गहाण ठेवले आहे. जगभरात ज्यांचे नाव एपस्टीन फाईलमध्ये आले त्यांचावर कारवाई झाली, पण मोदींवर कारवाई झाली नाही.

आज 23 मार्चला आरएसएस मुख्यालयावर काढण्यात येणाऱ्या मोर्चानंतर ब्लॅकमेल केले जात असलेल्या मोदी यांना किती काळ पंतप्रधान ठेवायचे याचा निर्णय आरएसएसला घ्यावा लागेल. याकडे ॲड आंबेडकर यांनी लक्ष वेधले आहे. नियोजित कार्यक्रमानुसार दुपारी 12 वाजता संविधान चौक ते आरएसएस मुख्य कार्यालय, असा हा मोर्चा असला तरी पोलिसांनी मोर्चाला संविधान चौक ते टेकडी रोड या परिसरातच रोखण्याचे नियोजन केलेले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप, संघ परिवारावर टीकास्त्र

अमेरिका राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची तुलना तात्या विंचू अशी केली. अमेरिकेपुढे मोदी सरेंडर झाले. ऑपरेशन सिंदूरमध्ये सरेंडर झाले, देशात सामान्य जनता सिलिंडरसाठी सरेंडर झाले आहेत, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. संघाने मोदी यांचा राजीनामा घ्यावा नाहीतर संघ बरखास्त करा, संविधान स्वीकारा असे आवाहन सपकाळ यांनी केले.

यापूर्वी तुषार गांधी यांच्यासोबत संघ विरोधात पुढे आलो आज अॅड. आंबेडकर यांच्या नेतृत्वात पुन्हा याच वैचारिक लढ्यासाठी सोबत आलो याकडे लक्ष वेधले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT