Nagpur Protest | एपस्टीन फाइल्स वाद : नागपुरात सोमवारी संघ मुख्यालयावर वंचित, काँग्रेसचा मोर्चा धडकणार

मोर्चाचे नेतृत्व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर करणार
Vanchit Bahujan Aghadi Congress Protest
Vanchit Bahujan Aghadi Congress ProtestPudhari
Published on
Updated on

Vanchit Bahujan Aghadi Congress Protest Nagpur

नागपूर : काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीतर्फे उद्या सोमवारी (दि. २३) नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे.

या मोर्चाचे नेतृत्व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर करणार आहेत. एपस्टीन फाइल्स वाद प्रकरणात भाजप नेत्यांची नावे आल्याचा आरोप करत हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.

या प्रकरणामुळे भारताची प्रतिमा आणि स्वाभिमान धोक्यात आला आहे. त्यामुळे या विषयावर संघाकडून स्पष्टीकरण मिळावे, अशी मागणी करण्यात येणार आहे.

या मोर्चात हजारो कार्यकर्ते सहभागी होण्याची शक्यता असून, सध्या पोलिस परवानगीची प्रक्रिया सुरू आहे. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोर्चाला संविधान चौकापुढे जाऊ दिले जाणार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news