Nagpur Accident File Photo
नागपूर

Nagpur Accident: नागपूरजवळ तीन कारचा भीषण अपघात; एका चालकाचा जागीच मृत्यू, दोन महिला गंभीर

नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथील राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी रात्री भीषण अपघात झाला.

मोहन कारंडे

Nagpur Accident

नागपूर: नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथील राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी रात्री भीषण अपघात झाला. दहेगाव-रंगारी परिसरातील कश्मिरा लॉन समोर तीन चारचाकी वाहने एकमेकांना धडकली. या तिहेरी अपघातात एका कार चालकाचा जागीच मृत्यू झाला असून, दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.

अज्ञात वाहनाच्या धडकेमुळे अपघात

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, महामार्गावर एक स्विफ्ट डिझायर कार यू-टर्न घेत होती. याच दरम्यान पाठीमागून येणाऱ्या एका भरधाव अज्ञात चारचाकी वाहनाने या स्विफ्ट डिझायर कारला जोरात धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, स्विफ्ट डिझायर कार थेट समोरून येणाऱ्या आय-२० कारवर जाऊन आदळली.

कार तीन वेळा पलटी झाली

या अचानक झालेल्या जोरदार धडकेमुळे आय-२० कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार रस्त्यावरच तीन वेळा पलटी झाली. या अपघातात आय-२० चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर कारमधील दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

धडक देणारे वाहन पसार; पोलिसांकडून तपास सुरू

अपघाताला कारणीभूत ठरलेले अज्ञात वाहन चालक घटनास्थळावरून गाडीसह पसार झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून, त्याद्वारे फरार अज्ञात वाहनाचा आणि त्याच्या चालकाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT