नागपुरातील शिक्षक मागील तीन महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. या बरोबरच 7व्या वेतन आयोगाचे हप्ते मिळाले नाहीत. तसेच थकीत देयकेसुद्धा मिळाली नाहीत. या संदर्भात अनिल महादेवराव शिवणकर, अध्यक्ष, नागपूर विभाग, भाजप शिक्षक आघाडी यांच्या नेतृत्वात सौम्या शर्मा ,मुख्य कार्यकारी अधिकारी व सिद्धेश्वर काळुसे,शिक्षणाधिकारी प्राथमिक नागपूर यांना निवेदन देण्यात आले.
कोषागार विभागाने थकीत व वैद्यकीय देयके मंजूर करूनही व तेवढ्या बिलाची रक्कम बँकेला पाठविले आहेत. मात्र, कोषागाराने मंजूर केलेल्या देयकाची बँक कॉपी लगेच बँकेला पाठविण्यात येत नाही. त्यामुळे त्यांचे थकीत देयकही शिक्षकांना मिळत नाही. कोषागाराने मंजूर केलेली देयके लगेचच बँकेत पाठवण्याची तरतूद आहे पण तसे घडत नाही. नागपूर जिल्ह्यातील २० टक्के ४० टक्के ६० टक्के अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षकांसाठी ५ एप्रिल २०२४ ला १ कोटी ६५ लक्ष रुपये शिक्षकांचे वेतन अनुदान प्राथमिक शिक्षण विभागाला प्राप्त झाले होते. मात्र, अजूनही ६२ प्राथमिक शाळांतील २६१ शिक्षकांचे वेतन मागील दोन महिन्यापासून झालेले नाही.
वेतन पथक विभाग प्राथमिक यांच्या निष्काळजीपणामुळे 25 लाख वेतन अनुदान २ ऑगस्ट २०२४ ला परत गेले. वेतन अनुदान असूनही शिक्षकांचे वेतन होत नाही. असलेले वेतन अनुदान दुसरीकडे वळविण्यात येते. त्यामुळे अंशतः अनुदानित शाळेतील प्राथमिक शिक्षकांना बरेचदा वेतनापासून वंचित राहावे लागते. बरेचदा वेतन अनुदानाची मागणी वेळेवर केल्या जात नाही. याप्रसंगी गौरव दातिर, राहुल अर्सडे, ललित धार्मिक,निनाद वंजारी, योगेश भगत , शुभांगी मॅडम सुवर्ण देशपांडे, कुनाल चौधरी ,अमोल वाहादुरे ,प्रफुल फुंसे,प्रवीण श्रीराम, योगेश शोभणे, ललित भोगांडे, भाग्यश्री सावरकर ,निखिल साबळे ,सचिन सोमकुवर ,वर्षा गणवीर ,व इतर पदाधिकारी उपस्थित होते.