Samruddhi Mahamarg safety Issue
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावरील लूटमार, रस्त्यावर खिळे आदी सोशल मीडियावर व्हायरल घटनांनी प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत होते. मात्र, समृद्धीचा प्रवास सुरक्षित असल्याचा दावा एमएसआरडीसी, वाहतूक विभागाने केला आहे.
9 सप्टेंबर रोजी 11वाजेपासून समृद्धी महामार्गावर, माळीवाडा इंटरचेंज छ. संभाजीनगर येथे (पोलीस स्टेशन दौलताबाद हद्दीतील) मेगा इंफ्रास्ट्रक्चर प्राइवेट लिमिटेड या कंपनीकडे समृद्धी महामार्गाच्या देखभालीचे काम असून पूर्ण बॅरिकेडिंग करून रस्त्याच्या भेगांसाठी इपॉक्सी ग्राउटिंग (Epoxy Grouting) सुरू होते. काँक्रीट रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी भेगेमध्ये इंजेक्शनद्वारे मिश्रण भेगेमध्ये टाकण्यासाठी नोझल लावण्यात आलेले होते.
सदर महामार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांनी बॅरिकेट उडवून काम सुरू असलेल्या रोडवरून गाडी घातल्यामुळे इतरही काही प्रवाशांच्या गाड्या पंक्चर झाल्या होत्या. गाडी पंक्चर झालेल्या प्रवाशांनी व्हिडीओ काढून चुकीचा मेसेज सोशल मीडियावर प्रसारित केला. सदर ठिकाणी चोरीचा कुठलाही प्रकार नाही. तसेच कुठलीही हानी झालेली नाही. MSRDC च्या वतीने देखभालीचे काम सुरू आहे. या बाबत महामार्ग पोलिस व स्थानिक पोलिसांच्या वतीने जनजागृती करण्यात येत आहे.
हा महामार्ग देखभालीचे काम पूर्ण झाल्याने सदर खिळे आज (दि.10) काढण्यात आलेले असून वाहतूक सुरळीत सुरु आहे. काम करत असताना दोन लेन सुरु होत्या आणि काम सुरु असलेल्या लेन मध्ये barricating करण्यात आले होते. परंतु एक गाडी barricate तोडून काम सुरु असलेल्या लेन मध्ये गेल्याने ती पंचर झाली आणि त्यामगे आणखी काही गाड्या पंचर झाल्या. चोरी चा कुठलाही प्रकार नसल्याचा दावा देखील आता जनजागृतीसाठी सोशल मीडियावर टाकण्यात आला आहे.