Mercedes hit and Run Accident Nagpur
रामझुला हिट अँड रन प्रकरणातील रितू मालूने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.  Pudhari File Photo
नागपूर

रामझुला हिट अँण्ड रन प्रकरण : अखेर रितू मालूचे आत्मसमर्पण

पुढारी वृत्तसेवा

नागपूर, पुढारी वृत्तसेवा: नागपुरातील मध्यवर्ती रेल्वे स्थानकावरील रामझुला ‘हिट अँड रन’ प्रकरणातील मद्यधुंद मुख्य आरोपी रितू मालू हिचा जामीन अर्ज उच्च न्यायालयानेही फेटाळल्यानंतर तिने आज (दि.१) नागपूर पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. रितिका मालूला दुपारी साडेतीन वाजता न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

रितीकाने भरधाव कारने दोन तरुणांना चिरडले

रामझुल्यावर 25 फेब्रुवारी रोजी मद्यधुंद अवस्थेत रितीकाने भरधाव मर्सडिज कार चालवत दोन तरुणांना चिरडले. या अपघातात मोमीनपुरा येथील मोहम्मद हुसेन गुलाम मुस्तफा (34) आणि जाफर नगर येथील मोहम्मद आतिफ (32) यांचा मृत्यू झाला.या घटनेनंतर तहसील पोलिसांनी रितिकाविरुद्ध भादंवि कलम ३०४ (सदोष मनुष्यवध), (निष्काळजीपणाने २७९ वाहन चालविणे), ३३६ (मानवी जीव धोक्यात टाकणारी कृती करणे), ३३८ (गंभीर जखमी करणे), ४२७ (आर्थिक नुकसान करणे) आणि मोटर वाहन कायद्यातील कलम १८४ (भरधाव वेगात वाहन चालविणे) व १८५ (दारूच्या नशेत वाहन चालविणे) या गुन्ह्यांतर्गत एफआयआर दाखल केला.

रितू मालूचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

दरम्यान, आरोपी रितिका उर्फ रितू दिनेश मालू हिचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळल्यानंतर तिला अटक होणार किंवा आत्मसमर्पण करावे लागणार हे निश्चित होते. अखेर रितू मालूने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. यापूर्वी नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयानेही तिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.

SCROLL FOR NEXT