नागपूर : बागेश्वरधामचे धीरेंद्र शास्त्री यांनी नागपुरात दुसऱ्यांदा पळ काढला. त्यांनी कुठलेही चॅलेंज स्विकारलेले नाही, जर धीरेंद्र शास्त्री यांनी चमत्कार सिद्ध करुन दाखवला तर मी माझे ४२ वर्षेांपासून सुरु असेल अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम बंद करेन. तसेच धीरेंद्र शास्त्री बाबांच्या पायावर डोके ठेवून त्यांचा भक्त बनेन असे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष प्रा श्याम मानव यांनी आज जाहीर केले आहे. याशिवाय ८० लाख रुपये बक्षिस देखील धीरेंद्र शास्त्री यांना देऊ, पण बागेश्वर बाबा यांच्या दरबारात नाही तर त्रयस्थ ठिकाणी समोरासमोर येऊ.
नागपूरच्या पत्रकार संघात दहा लोकांना त्यांनी ओळखून दाखवावे.पत्रकार संघाच्या बाजूच्याच खोलीत दहा लोक बसले असतील त्यांना त्यांची ओळखून दाखवावे. शेवटी हा स्थळाचा मुद्दा नसून जर दिव्य दरबारात दहा लोक त्यांनी आणले तर ते लोक त्यांच्या ओळखीचे असू शकतात. आजच्या सोशल मिडिया आणि टेक्नाॅलाजीचा युगात कोणाचीही माहिती मिळू शकते त्यामुळे आम्ही दिव्य दरबारात हे चॅलेंज नको असा आमचा आग्रह आहे.
धीरेंद्र शास्त्री महाराज हा भोंदू आहे कारण त्याने देव आपल्यात आहे असे सांगितले आहे. दिव्य दरबारातील तमाशात आम्ही कशाला जाऊ, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्रयस्थ ठिकाणी हे चॅलेंजसाठी आयोजन करावे, असे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी सांगितले.