Nagpur Municipal Corporation Election
नागपूर : नागपूर महापालिका निवडणुकीसाठी महायुती व्हावी, असा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आग्रह आहे. मात्र, मित्र पक्षांनी जागांसंदर्भात सामंजस्य दाखवले. तर निश्चितच नागपुरात महायुती होईल, अन्यथा भाजपचा नाईलाज असेल, अशी माहिती नागपूर महानगरपालिकेसाठी भाजपचे निवडणूक प्रभारी आमदार प्रवीण दटके यांनी दिली.
सध्या नागपुरात मित्र पक्षांसोबत महायुतीसाठीची चर्चा सुरू आहे. आमचे सर्व वरिष्ठ नेते महायुती घडवून आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. फक्त मित्र पक्षांचा जास्त जागांच्या आग्रह संदर्भात काय निर्णय होतो यावर महायुतीचे भवितव्य ठरेल असेही दटके म्हणाले.
आमच्याकडे पंधराशेपेक्षा जास्त उमेदवारांनी मागणी केली आहे. त्यामुळे थोडा वेळ लागेल. ज्यांच्याकडे कमी जागा त्यांचे लवकर होईल. मात्र आम्ही लवकरात लवकर उमेदवारी जाहीर करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत, असे दटके यांनी सांगितले.