Prakash Ambedkar Pudhari
नागपूर

Prakash Ambedkar | भाजपने अनेक ठिकाणी आमची आघाडी होऊ दिली नाही : प्रकाश आंबेडकरांचा आरोप

मनपा निवडणुकीच्या निमित्ताने त्यांची आज नागपुरातील इंदोरा मैदानावर जाहीर सभा होणार

पुढारी वृत्तसेवा

Maharashtra Municipal Corporation Elections

नागपूर : मुंबईसह इतरत्र आमच्या पक्षाच्या जागा वाटपासह 80 टक्के वाटाघाटी झालेल्या असताना भाजपने अनेक ठिकाणी जाणीवपूर्वक आघाडी होऊ दिली नाही, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

मनपा निवडणुकीच्या निमित्ताने त्यांची आज नागपुरातील इंदोरा मैदानावर जाहीर सभा होणार आहे. अंबरनाथ आणि अकोटमधील अभद्र आघाडी संदर्भात छेडले असता सध्या संसदीय लोकशाहीची थट्टा सुरू आहे. जे चौकशीच्या फेऱ्यात आहेत ते भाजपच्या समर्थनात बोलत आहेत.

मुळात निवडणुकीसाठी अर्ज भरल्यावर दडपशाही, दमदाटीने माघार घेता येणार नाही असा कायदा हवा, मात्र ज्यांचा लोकशाहीवर, निवडणुकांवर विश्वास नाही त्यांच्याकडून अपेक्षा नाही असे सांगत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या विलासराव देशमुख यांचे संदर्भातील वक्तव्याला मूर्खपणा असेही आंबेडकर यांनी संबोधले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT