नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग साकारण्यात आलेला भव्य ऑक्सिजन पार्क Pudhari Photo
नागपूर

नागपूरातील ऑक्सिजन बर्ड पार्कचे शनिवारी लोकार्पण

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ऑक्सिजन बर्ड पार्कचे लोकार्पण येत्या शनिवारी (दि.28) दुपारी 12 वाजता होणार आहे. गडकरी यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत वर्धा मार्गावरील जामठा क्लोव्हर लिफ येथे या अफलातून ऑक्सिजन पार्कचे उदघाटन होणार आहे.

गडकरी यांच्या संकल्पनेतून आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या पुढाकारातून नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर हा ऑक्सिजन बर्ड पार्क साकारण्यात आला आहे. १४.३२ कोटींचा हा प्रकल्प जवळपास २० एकरमध्ये साकारण्यात आला असून याठिकाणी केवळ पक्ष्यांसाठी विशिष्ट फळझाडांची लागवड करण्यात आली आहे. या उद्यानाचे महत्त्व केवळ ऑक्सिजन देणारा परिसर एवढेच नाही. तर पक्ष्यांच्या विविध प्रजातींसाठी हा परिसर आश्रयस्थान म्हणून उपयुक्त ठरणार आहे. विशेष म्हणजे 8,104 प्रकारच्या वनस्पतींसह 11 हेक्टर क्षेत्रफळावर ऑक्सिजन पार्क विकसित करण्यात आला आहे. या प्रकल्पात नैसर्गिक तळ्यांनाही समाविष्ट करून घेण्यात आले आहे.

या उद्यानात फूड कोर्ट, प्रसाधनगृहे, चालण्याचे मार्ग, जॉगिंग आणि सायकलिंग ट्रॅक, वॉचटॉवर, ॲम्पीथिएटर प्लॅटफॉर्म आणि मुलांसाठी विशेषक्रीडा क्षेत्र यासह विविध प्रकारच्या सुविधा आहेत. प्रवेशद्वारावर आकर्षक आर्किटेक्चरल डिझाईनचे आहे. विशेष म्हणजे हे उद्यान विविध प्रकारची फळे देणाऱ्या वनस्पतींनी समृद्ध आहे. जांभळे, आंबा, पेरू, बेल, चिंच, अंजीर, खिरणी, पिंपळ, सीताफळ, आवळा ही झाडे फक्त पक्ष्यांसाठी संरक्षित असणार आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT