नागपूर

winter session 2023 : ऑक्सिजन मास्क लावून विरोधकांचे आरोग्य व्यवस्थेविरोधात आंदोलन

अविनाश सुतार

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : राज्यातील ढासळलेल्या व व्हेंटिलेटरवर असलेल्या आरोग्य व्यवस्थेविरोधात मविआच्या आमदारांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आज (दि.१२) प्रतिकात्मक आंदोलन केले. जनतेचे आरोग्य खराब करणाऱ्या सरकारचे स्टेटोस्कोप घेऊन तपासणी करणार, अशा शब्दांत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आरोग्य व्यवस्थेवरून सरकारला चिमटा काढला. winter session 2023

गळ्यात स्टेटोस्कोप व तोंडाला मास्क घालून 'मंत्री खात तुपाशी, रुग्ण मरतायत उपाशी' रुग्णांना नाही औषध, गोळी, आरोग्य व्यवस्थेची झाली होळी', अशा घोषणा देत विरोधी पक्षनेत्यांनी विधीमंडळ परिसर दणाणून सोडला. winter session 2023

राज्यात आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. राज्यात नागपूर, नांदेड, संभाजी नगर, कळवा या ठिकाणी औषधाविना मोठया प्रमाणात मृत्यू झाले. तरी सरकारने औषधे खरेदी केलेली नाही. राज्याची आरोग्य व्यवस्था गॅसवर आहे. सरकार जनतेचे आरोग्य राखू शकत नाही, जीव वाचवू शकत नाही की रुग्णांना ५ रुपयांची गोळी देऊ शकत नाही. याला सर्वस्वी सरकार, आरोग्य विभाग जबाबदार असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT