Newly elected MLAs welcomed in Nagpur
आमदार कृपाल तुमाने, परिणय फुके यांचे नागपुरात जल्‍लोषात स्‍वागत  Pudhari Photo
नागपूर

आमदार कृपाल तुमाने, परिणय फुके यांचे नागपुरात जल्‍लोषात स्‍वागत

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : पुढारी वृत्‍तसेवा

बुधवारी झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने सर्वच 9 जागांवर विजय मिळवत महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय डॉ परिणय फुके (भाजप), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निष्ठावंत आणि लोकसभा निवडणुकीत खासदारकीची संधी सोडणारे कृपाल तुमाने (शिवसेना) यांच्या निमित्ताने नागपूरला आणखी 2 आमदार मिळाले आहेत. नवनिर्वाचित आमदार कृपाल तुमाने, परिणय फुके, भावना गवळी यांचे (शनिवार) आगमन प्रसंगी नागपुरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर जल्लोषात स्वागत झाले.

यावेळी ही आगामी विधानसभा निवडणुकीच्या विजयाची सुरुवात आहे. पुन्हा आमचेच सरकार सत्तेत येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी आ आशीष जैस्वाल उपस्थित होते. स्वागताचा स्वीकार केल्यानंतर रॅलीने ते आपल्या निवासस्थानी पोहोचले. पावसाळी वातावरणातही महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. फटाके फोडत, ढोलताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी मिठाई भरवत हा आनंदोत्सव साजरा केला.

SCROLL FOR NEXT