Nagpur Chandrapur NEET students
नागपूर: सध्या देशभरात गाजत असलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणातील तपासात विदर्भ कनेक्शन समोर आले आहे. सीबीआयच्या दिल्ली येथील पथकाने मंगळवारी नागपूर येथे दोन तर चंद्रपूर येथे एका उमेदवाराच्या घरी झाडाझडती घेतली.
आजच्या कारवाईने देखील आता शिक्षण वर्तुळात खळबळ माजली आहे. यावेळी ताब्यात घेण्यात आलेले डिजिटल पुरावे दिल्ली येथील सीबीआय कार्यालयाकडे रवाना करण्यात आले आहेत. यातून काही मोठे मासे पकडले जाण्याची शक्यता आहे.
सोमवारपासूनच या संदर्भात सीबीआयने पाळत ठेवल्याची माहिती आहे. सीबीआयचे अधिकाऱ्यांनी या विद्यार्थ्यांकडे लॅपटॉप, मोबाईल आणि इतर कागदपत्रांची तपासणी केली. यात काही आक्षेपार्ह बाबी लक्षात आल्याचे समजते.
आर्थिक हितसंबंधातून मोठ्या प्रमाणात नीट पेपरफूट करण्यात अनेकजण गुंतले असण्याचे पुढे येत आहे. यापूर्वी 2015 साली एआय पी एम टी तर 2019 साल नीट परीक्षेच्या संदर्भात देखील अशाच प्रकारे धागेदोरे थेट नागपूर पर्यंत पोहोचल्याचे उघड झाले होते.