Census Awareness Campaign Nagpur Pudhari
नागपूर

NCP Nagpur | राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ‘जनगणना जन-जागृती’ मोहिमेचा शुभारंभ

​नागपूर शहरतर्फे दक्षिण नागपूरमधील प्रसिद्ध रमणा मारुती मंदिर गेट येथून 'जनगणना जन-जागृती' मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला

पुढारी वृत्तसेवा

Census Awareness Campaign Nagpur

नागपूर: देशाच्या पहिल्या डिजिटल जनगणनेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आणि त्यांना ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेत मदत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, नागपूर शहरतर्फे दक्षिण नागपूरमधील प्रसिद्ध रमणा मारुती मंदिर गेट येथून 'जनगणना जन-जागृती' मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.

शहराध्यक्ष अनिल अहिरकर व कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमाला पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रत्येकाने आपली नोंद अचूक करणे आवश्यक आहे. १५ वर्षांनंतर होत असलेल्या या जनगणनेत तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांचा वेळ वाचवण्यासाठी ही मोहीम उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

सोमवारपासून ही मोहीम नागपूर शहरातील सर्व सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये व्यापक स्तरावर राबविण्यात येणार आहे. पक्षाचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन डिजिटल जनगणनेचे महत्त्व पटवून देतील आणि नागरिकांना पोर्टलवर माहिती भरण्यासाठी तांत्रिक मार्गदर्शन करतील. या कार्यक्रमाचे नियोजन दक्षिण नागपूरचे आयोजक मुकेश रेवतकर आणि उपाध्यक्ष नितीन ढेंगे यांनी केले.

याप्रसंगी लक्ष्मी सावरकर, जानबा मस्के, विशाल खांडेकर, अभीदत्त फाले, ब्रह्मानंद मस्के, दिनेश रोडगे, राजू मिश्रा, माँटी गंडेचा, चंद्रकांत नायक, सुरेश करणे, मनोज जरेल, राजेंद्र भोयर, रवींद्र वाठ, अमित पिचकाटे, रूपाली पिचकाटे, संदेश खोब्रागडे, पुरुषोत्तम कोकाटे, साहिल जाधव, मनीष पुंड, नामदेव देशकर, विश्वास सेलसूरकर, राजेश कुकवास, योगेश चीवांडे, लाडीकर, अरुण निबल, गोविंदराव सोमकुवर, निर्मला मोडक, रोशन जणबंधू, राजेंद्र पाटील यांच्यासह वस्तीतील नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT