नागपूर; पारडी उड्डाण पुलावरून खाली पडून एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. Pudhari News Network
नागपूर

नागपूर : पारडी उड्डाणपुलावरून कोसळून तरुणाचा मृत्यू

भरधाव मोपेडवरील नियंत्रण सुटल्याने दुर्घटना

पुढारी वृत्तसेवा

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : अलीकडेच ओव्हरस्पीड कारमुळे कोराडी रोडवर झालेल्या भीषण अपघाताची व दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना शनिवारी (दि.१३) दुपारी नागपुरातील पारडी उड्डाण पुलावरून खाली पडून एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. 26 वर्षीय या युवकाचे नाव योगेश्वर भगत चुटे असे आहे. तो गोंदिया जिल्ह्यातील सलंगटला, सालेकसा येथील रहिवासी आहे.

डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू

तो भरधाव जात असताना त्याची अनियंत्रित मोपेड एकीकडे पडलेली तर तो साईनेज बोर्डसह दुसरीकडे पुलाखाली पडलेला होता. डोक्यात हेल्मेट नसल्याने खाली पडताच डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या युवकाला परिसरातील नागरिकांनी लगेच जवळच्या इस्पितळात नेले. मात्र, डॉक्टरांनी मृत घोषित केले. तातडीने पोलीस घटनास्थळी पोहचले व मेडिकलला नेण्यात आले. तो नागपुरातील सुभान नगर इंदिराबाई तिड़के कॉलनीत राहतो. तसेच भारत फायनांसमध्ये नोकरीला आहे.

पोलीस केवळ चिरीमिरी घेण्यापुरते कारवाया करतात

गेल्या काही दिवसांत भरधाव वाहनामुळे होणारे अपघात तसेच हिट अँड रन च्या घटना वाढल्या आहेत. हेल्मेट न घालता दुचाकी चालवण्याचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढले असून वाहतूक पोलिसांनी याकडे तातडीने लक्ष देण्याची, ठोस कारवाई करण्याची मागणी होत आहे. मोबाईलवर बोलत वाहन चालविताना अनेकजण सीसीटीव्ही फुटेज मध्ये आढळून येत असताना देखील वाहतूक पोलीस केवळ चिरीमिरी घेण्यापुरते या कारवाया करताना दिसत असल्याचा संताप नागरिकांनी या घटनेनंतर व्यक्त केला. अशा घटनांना वेळीच आळा घालण्याच्या दृष्टीने वाहतूक पोलिसांनी कडक कारवाई करणे गरजेचे झाले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT