Vikas Thakre Pudhari
नागपूर

Vikas Thakre | नागपुरातील ‘वॉकेबल स्ट्रीट’ या प्रकल्पाची ड्रग्स स्ट्रीट’ म्हणून ओळख: विकास ठाकरे

पश्चिम नागपूरचे काँग्रेसचे आमदार ठाकरे यांनी विधानसभेत नागपूर महानगरपालिकेच्या वादग्रस्त ‘वॉकेबल स्ट्रीट’ प्रकल्पाचा भांडाफोड

पुढारी वृत्तसेवा

Walkable Street Nagpur

नागपूर : पश्चिम नागपूरचे काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी विधानसभेत नागपूर महानगरपालिकेच्या वादग्रस्त ‘वॉकेबल स्ट्रीट’ प्रकल्पाचा भांडाफोड केला. सुमारे २० कोटी रुपयांच्या सार्वजनिक निधीचा झालेला अपव्यय आणि या प्रकल्पामुळे निर्माण झालेली गंभीर कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती उघडकीस आणली.

ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले की, अभ्यंकर नगर चौक ते बजाज नगर चौक ते काचीपुरा चौक या मार्गावरील ‘वॉकेबल स्ट्रीट’ हा प्रकल्प आज नागरिकांच्या भाषेत ‘ड्रग्स स्ट्रीट’ म्हणून ओळखला जाऊ लागला असून येथे खुलेआम दारू पिणे, ड्रग्सचे सेवन आणि इतर असामाजिक कृत्ये सुरू आहेत.

यावर उत्तर देताना मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले की या परिसरात यापुढे कोणतीही असामाजिक घटना घडल्यास संबंधित पोलीस निरीक्षक यांना थेट जबाबदार धरले जाईल. तसेच, या ठिकाणी असामाजिक कृत्यांना आळा घालण्यासाठी विशेष मोहीम तातडीने राबविण्यात येईल.

ठाकरे यांनी विधानसभेत मांडलेले ठळक मुद्दे

संबंधित रस्ता आधीपासूनच चांगल्या स्थितीत असताना, २० कोटी रुपयांचा खर्च करणे पूर्णपणे अनावश्यक होते.

* वाढत्या वाहनसंख्येमुळे रस्ते रुंद करण्याची गरज असताना, या प्रकल्पामुळे उलट रस्त्याची रुंदी कमी करण्यात आली.

* या प्रकल्पात पार्किंग झोन, सार्वजनिक शौचालये आणि इतर मूलभूत सुविधा पूर्णपणे दुर्लक्षित करण्यात आल्या आहेत

* रस्त्याच्या एका बाजूला तयार करण्यात आलेले सायकल ट्रॅक, वॉकिंग ट्रॅक आणि बसण्यासाठी जागा हे आता दारू, ड्रग्स आणि असामाजिक कृत्यांचे अड्डे बनले आहेत.

* या परिसरात ईव्ह-टीझिंग आणि गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाल्याची गंभीर तक्रार नागरिकांकडून येत आहे.

* या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून, दोषी अधिकारी आणि संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने ठोस उपाययोजना राबवाव्यात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT