BJP Candidate Rajeev Potdar Wins Pudhari
नागपूर

Nagpur MLC Election Results | नागपूर विधान परिषद निवडणुकीत भाजपचे डॉ. राजीव पोद्दार यांचा दणदणीत विजय

भाजपला ६८२ तर काँग्रेसला १३० मते

पुढारी वृत्तसेवा

BJP Candidate Rajeev Potdar Wins

नागपूर : नागपूर विधान परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ. राजीव पोद्दार यांनी मोठा विजय मिळवत विरोधकांवर निर्णायक मात केली आहे. एकूण ८३४ मतदारांपैकी ८२३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये भाजपचे उमेदवार डॉ. पोद्दार यांना ६८२ मते मिळाली, तर काँग्रेसचे उमेदवार अतुल लोंढे यांना १३० मतांवर समाधान मानावे लागले. निवडणुकीत ११ मते खारीज झाली.

नागपूर विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीत भाजपचे उमेदवार डॉ. राजीव पोद्दार यांनी सुरुवातीपासूनच आघाडी कायम ठेवत दणदणीत विजय मिळवला. या निवडणुकीत एकूण ८३४ मतदार होते. त्यापैकी ८२३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान झालेल्या मतांमध्ये भाजपला ६८२ तर काँग्रेसला १३० मते मिळाली. तसेच ११ मते खारीज ठरली.

या निकालामुळे नागपूरच्या राजकीय वर्तुळात भाजपने पुन्हा एकदा आपले संघटनात्मक बळ सिद्ध केले आहे. आगामी राजकीय घडामोडींवरही या निकालाचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

निकाल जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. अनेक ठिकाणी मिठाई वाटप, फटाक्यांची आतषबाजी आणि जल्लोष करत कार्यकर्त्यांनी विजयाचा उत्सव साजरा केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT