Maharashtra Weather Forecast Pudhari
नागपूर

Vidarbha Rain | विदर्भात पावसाचा जोर मंदावला, पुढील काही दिवस तुरळक सरींची शक्यता

विदर्भात पावसाचा जोर पुढील काही दिवस मंदावणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे

पुढारी वृत्तसेवा

IMD Nagpur Forecast

नागपूर : राज्याच्या अनेक भागांत धुमाकुळ घालणारा मान्सून विदर्भातही काही प्रमाणात सक्रिय असला तरी विदर्भात पावसाचा जोर पुढील काही दिवस मंदावणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

बंगालच्या उपसागरात अद्याप प्रभावी कमीदाबाची प्रणाली किंवा चक्रीय स्थिती निर्माण झालेली नाही. परिणामी विदर्भात जोरदार पावसासाठी पोषक वातावरण नाही, अशी माहिती हवामान विभागाने दिली.

दरम्यान, मंगळवारी दिवसभर रात्री उशीरपर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती. रात्री आठ वाजतानंतर शहराच्या बहुतांश भागांत, ग्रामीणमध्ये दमदार पावसाने तारांबळ उडविली. यामुळे सखल भागांत पाणी शिरले. अनेक ठिकाणी वाहतुकीला अडथळा निर्माण झाला.

मंगळवारी शहराला 'यलो अलर्ट' होता. आजपासून शहराला कोणताही इशारा नाही. त्यामुळे पुढील काही दिवस तुरळक सरींची शक्यता असून, शेतकऱ्यांना पेरणीनंतर पिकांच्या वाढीसाठी आवश्यक पावसाची प्रतीक्षा कायमच असणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT