पाच ते सहा वर्षांचा एक पट्टेदार नर वाघ मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ  Pudhari
नागपूर

Nagpur Tiger Death | उमरेड वनपरिक्षेत्रात पट्टेदार नर वाघ मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ

वाघाचे सर्व अवयव कातडी, नखे, सुळे, दात, पाय, शेपूट, मिश्या इत्यादी पूर्णपणे शाबूत

पुढारी वृत्तसेवा

Umred Forest Range Striped Male Tiger

नागपूर : दक्षिण उमरेड वनपरिक्षेत्रातील उपवनक्षेत्र नांद्रा, नियतक्षेत्र नांद्रा (पश्चिम) मधील मौजा चनोडा शिवारात शनिवारी (दि.१३) सकाळच्या सुमारास पाच ते सहा वर्षांचा एक पट्टेदार नर वाघ मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ माजली.

याविषयीची माहिती स्थानिक ग्रामस्थाकडून वनकर्मचाऱ्यांना मिळाली. घटनास्थळाची पाहणी केली असता वाघाचे शव वनकक्ष क्र.364PF ला लागून असलेल्या नाल्यात आढळून आले. लगेच राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (NTCA) च्या आधारभूत मानक प्रणाली नुसार कार्यवाही करण्यात आली.

घटनास्थळावरुन मृत वाघास वनपरिक्षेत्र कार्यालय परिसरात आणण्यात आले व मार्गदर्शक सूचनांनुसार शवविच्छेदन व नंतर दहन करण्यात आले. प्राथमिक तपासणीत वाघाचे सर्व अवयव कातडी, नखे, सुळे, दात, पाय, शेपूट, मिश्या इत्यादी पूर्णपणे शाबूत आहेत. वाघाच्या मृत्युचे कारण शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे.

सदर कार्यवाही जी. गुरुप्रसाद, वनसंरक्षक (प्रादेशिक), नागपूर वनवृत्त; डॉ. विनीता व्यास, उपवनसंरक्षक, मनोज धनविजय, सहाय्यक वनसंरक्षक, उमरेड, विवेक आंबटकर, वनपरीक्षेत्र अधिकारी,

दक्षिण उमरेड यांच्या उपस्थितीत डॉ. सुजित कोलंगत, गोरेवाडा; डॉ. अश्विनी जगजापे, सहायक आयुक्त, पशुवैद्यकीय चिकित्सालय, उमरेड; डॉ. पूजा हिवरकर, पशुवैद्यकीय अधिकारी, चांपा; डॉ. पूनम नागपुरे, पशुवैद्यकीय अधिकारी, आपतूर; डॉ. योगेश राघोर्ते, पशुवैद्यकीय अधिकारी, सिर्सी यांच्या चमूने पार पाडली. यावेळी अविनाश लोंढे, रोहित कारू प्रधान मुख्य वनसंरक्षक यांचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT