हल्दीरामजवळ एमडी ड्रग्जची विक्री करण्यासाठी आलेल्या दोन आरोपींना पोलिसांनी रंगेहात अटक केली  Pudhari
नागपूर

Nagpur Drugs Case | हल्दीरामजवळ एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक

सदर पोलिसांची धडक कारवाई; ५.३० ग्रॅम अमली पदार्थ जप्त

पुढारी वृत्तसेवा

MD Drugs Bust Nagpur

नागपूर : नागपूरमध्ये अमली पदार्थांविरोधातील कारवाई अधिक तीव्र करत सदर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. सदर परिसरातील हल्दीरामजवळ एमडी ड्रग्जची विक्री करण्यासाठी आलेल्या दोन आरोपींना पोलिसांनी रंगेहात अटक केली. त्यांच्याकडून ५.३० ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे.

नागपूर शहरात वाढत्या अमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी नागपूर पोलिसांकडून सातत्याने विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच मोहिमेअंतर्गत सदर पोलिसांनी धडक कारवाई करत दोन संशयित आरोपींना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर परिसरातील हल्दीरामजवळ काही व्यक्ती एमडी ड्रग्ज विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी परिसरात सापळा रचून संशयितांवर नजर ठेवली होती.

कारवाईदरम्यान पोलिसांनी संशयित हालचाली करणाऱ्या दोन व्यक्तींना अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच दोन्ही आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी सतर्क असलेल्या पोलिसांनी तत्काळ पाठलाग करून दोघांनाही ताब्यात घेतले.

तपासादरम्यान आरोपींची झडती घेतली असता त्यांच्याकडून ५.३० ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थाची किंमत आणि त्याचे नेमके स्रोत याबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. सध्या दोन्ही आरोपींची कसून चौकशी केली आहे. या प्रकरणामागे आणखी मोठे रॅकेट कार्यरत आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT