Nagpur Crime | उधारीच्या 2 हजारांवरून वाद; हिस्ट्रीशीटरसह दोन अल्पवयीनांकडून तरुणावर जीवघेणा हल्ला

व्याजाच्या नावाखाली अतिरिक्त पैशांची मागणी; मारहाण करून रोकड लुटल्याचा आरोप
Crime News
Crime News : file photo
Published on
Updated on

Nagpur Minor Boys Attack Youth

नागपूर : नागपूर शहरातील इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामबाग परिसरात अवघ्या 2 हजारांच्या उधारीच्या पैशांवरून झालेल्या वादाने हिंसक स्वरूप धारण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हिस्ट्रीशीटर आरोपीने आपल्या दोन अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने एका तरुणावर जीवघेणा हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत मुख्य आरोपीसह दोन्ही अल्पवयीनांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गिट्टीखदान परिसरातील रहिवासी सूरज मुरमुरे यांनी काही दिवसांपूर्वी आरोपी मयूर फुले याच्याकडून 2 हजार उधार घेतले होते. सूरज यांनी घेतलेली मूळ रक्कम परत केल्यानंतरही आरोपी मयूर फुले हा व्याजाच्या नावाखाली आणखी 1 हजारांची मागणी करत होता. याच कारणावरून त्याने सूरज यांना रामबाग परिसरात बोलावले होते.

Crime News
Nagpur Bribe Case : मेयोतील मेडिकल प्रमाणपत्रासाठी 30 हजारांच्या लाचेची मागणी; विभागप्रमुखांसह स्टेनोग्राफर एसीबीच्या ताब्यात

रामबाग परिसरात दोघांमध्ये पैशांच्या कारणावरून वाद निर्माण झाला. वाद वाढल्यानंतर संतापलेल्या मयूर फुलेने लाकडी दांडक्याने सूरज यांच्या डोक्यावर वार केला. त्याच्यासोबत असलेल्या दोन अल्पवयीन साथीदारांनीही सूरज यांना बेदम मारहाण केल्याचे समोर आले आहे. एवढ्यावरच न थांबता, हल्ल्यानंतर आरोपींनी सूरज यांच्या खिशातील 1 हजारांची रोकड हिसकावून घटनास्थळावरून पळ काढल्याचा आरोप करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच इमामवाडा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी सूरज यांना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत मुख्य आरोपी मयूर फुले आणि त्याच्या दोन्ही अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले.

Crime News
Nagpur Crime : नागपुरात एनडीपीएस पथकाची मोठी कारवाई; 50 किलोहून अधिक गांजा जप्त

प्राथमिक तपासात मुख्य आरोपी मयूर फुले याच्याविरुद्ध यापूर्वी खून, खुनाचा प्रयत्न आणि मारहाण यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. तसेच तो बेकायदेशीर सावकारीचा व्यवसाय करत असल्याची माहितीही तपासात पुढे आली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास इमामवाडा पोलीस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news