Nagpur temperature 8 degrees
नागपूर : उपराजधानी नागपूरमध्ये थंडीचा पारा बुधवारी (दि.१०) 8 अंश सेल्सिअस पर्यंत खाली घसरल्याने वातावरणात गारठा निर्माण झाला आहे. कडाक्याची थंडी, बोचरे वारे वाहत असल्याने राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी आलेल्या पाहुण्यांना आरोग्याच्या तक्रारींचा सामना करावा लागत आहे.
तर दुसरीकडे हिवाळी अधिवेशनात राजकीय वातावरण तापले आहे. जमीन गैरव्यवहार, शेतकऱ्यांची कर्जमाफी, नाशिक कुंभमेळ्याच्या तयारीतील वृक्षतोड, महिलांवरील अत्याचार अशा विविध मुद्द्यांवर सत्तारूढ पक्ष-विरोधकांमध्ये तीव्र संघर्ष होण्याचे संकेत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण विदर्भ कडाक्याच्या थंड लाटेत आहे. शनिवारी सकाळी नागपूरने ९.६ अंश सेल्सिअस तापमान अनुभवले. यानंतर सोमवारी पारा 8.5 अंशावर आला. प्रादेशिक हवामान केंद्रानुसार पुढील आठवड्यात तापमानात आणखी घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. २९ डिसेंबर २०१८ रोजी तर नागपूरने तब्बल ३.५ अंश इतका नीचांकी पारा अनुभवला होता.