Nagpur News
नागपूर - नागपुरातील आराध्य दैवत श्री गणेश मंदिर टेकडीला राज्य सरकारकडून पर्यटन क्षेत्राचा अ दर्जा मोठ्या संघर्षातून मिळाला. मात्र जाहीर केलेला निधी अद्यापही मिळू न शकल्याने संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने गणेशभक्तांनी संताप व्यक्त केला.
51 कोटी रुपये जिर्णोद्धार व सौंदर्यीकरण करण्यासाठी मिळावेत म्हणून गेल्या 11 वर्षांपासून सतत संघर्ष, पाठपुरावा सुरू आहे. 11 मार्च 2024 ला अ पर्यटन क्षेत्राचा दर्जा शासनाने घोषित केला व फक्त नावाला 5 कोटी रुपये जिर्णोद्धार व सौंदर्यीकरण करण्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध झाला. 29 मार्च 2024 रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 22/7/2019 ला देवेंद्र फडणवीस व तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्श्यारी यांनी 2021 ला लेखी पत्र दिले.
तसेच पालकमंत्री नागपूर चंद्रशेखर बावनकुळे व आमदार प्रवीण दटके व कृष्णा खोपडे यांनी ही उर्वरित 46 करोड रुपये जिर्णोद्धार व सौंदर्यीकरण करण्यासाठी शासनाकडून निधी तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून लेखी पत्र दिले. नुकताच जो जनता दरबार नागपूर येथे झाला त्यावेळी आम्ही भेटून लेखी निवेदन दिले. परंतु दुर्दैवाने हा निधी उपलब्ध झालाच नाही. आज संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लाखो गणेश भक्तांच्या वतीने भाजपा माजी उपाध्यक्ष व जागृत सामाजिक कार्यकर्ता, गणेश भक्त भूषण दडवे यांनी पुन्हा एकदा हा निधी लवकर द्यावा यासाठी संबंधितांनी दिलेले पत्र संदर्भ देत साकडे घातले आहे.