Nagpur factory blast death toll 23
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील एसबीएल एनर्जी कंपनीत झालेल्या भीषण स्फोटातील गंभीर जखमी आणखी तीन महिलांचे गेल्या 48 तासात मृत्यू झाल्याने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 23 झाली आहे. एसबीएल स्फोटात जखमी सीमा धुर्वे या महिलेचा सोमवारी (दि.९) सायंकाळी 6 वाजता नागपूरच्या ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. आम्रपाली कालसर्पे, रोशनी उमाठे यांचा यापूर्वी मृत्यू झाला.
ऑरेंज सिटी रुग्णालयामध्ये या महिलांवर उपचार सुरू होते. या घटनेने नागपूर जिल्ह्यातील विविध स्फोटक निर्मिती कंपनीच्या सेफ्टी ऑडिटचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विधिमंडळात देखील याविषयी लक्षवेधी चर्चा झाली. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर पोलिस स्टेशनच्या हद्दीत राऊळगाव येथील एसबीएल एनर्जी लिमिटेड या स्फोटके तयार करणाऱ्या कंपनीत 15 दिवसापूर्वी ही भीषण घटना घडली.
राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सोमवारी आकस्मिक सोमवारी पेठ परिसरातील ईएसआयसी रुग्णालयाला भेट देत पाहणी केली. आपल्या भेटीदरम्यान त्यांनी रुग्णांशी संवाद साधला. रुग्णालयात मिळणारे उपचार, जेवणाचा दर्जा आदी माहिती जाणून घेतली. रुग्णालय परिसराचीही त्यांनी पाहणी केली.
रुग्णालयात ठेवली जाणारी स्वच्छता याचीही कर्मचाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांनी डॉक्टरांशीही संवाद साधला. रुग्णांना दिले जाणारे उपचार, औषधांची उपलब्धता याची माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांच्यासमवेत आरोग्य उपसंचालक डॉ. शशिकांत शंभरकर उपस्थित होते.