नागपूर

नागपूर : सावनेरला भर बाजारात एटीएम फोडून १० लाख लंपास

अविनाश सुतार

नागपूर: पुढारी वृत्तसेवा : नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथील बाजार चौकातील स्टेट बँकेचे एटीएम फोडून चोरट्यांनी तब्बल साडे दहा लाखांची रक्कम पळवल्याची घटना घडली. मंगळवारी (दि.३०) घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार सोमवारी मध्यरात्री ३.३० वाजता एक चारचाकी वाहन सावनेरमधील बाजार चौकातील स्टेट बँकेच्या एटीएमपुढे थांबले. त्यातून तीन ते चार आरोपी तोंडावर कापड बांधलेल्या अवस्थेत खाली उतरले. त्यांनी तेथे कुणीही नसल्याचे बघत गॅस कटर घेऊन एटीएम फोडले. त्यातील १० लाख ३० हजार रुपये रोख घेऊन आरोपी पसार झाले.

पहाटे परिसरातील नागरिक येथे गोळा झाले. काहींना बँकेच्या एटीएममधून पाणी बाहेर येताना दिसल्याने त्यांनी शोध घेतला. गॅस कटरने मशिन कापताना पाण्याचा वापर करण्यात आला. पोलिसांना प्राथमिक तपासात सुरक्षा रक्षक रात्री तैनात नसल्याचे आढळले. पोलिसांनी येथील सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतल्याची माहिती आहे. पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार आणि इतरही अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT