Savner Dwarka Water Park Incident
नागपूर: नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील द्वारका वॉटर पार्क वाकी येथील बाऊन्सर आणि सुरक्षारक्षक यांच्याकडून कामठी येथील एका परिवाराला मारहाण करण्यात आली. तब्बल दीड तास एका रूममध्ये कोंबून ठेवण्यात आले. बेशुद्ध असलेल्या दोन महिलांना नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या प्रकरणानंतर अनेक पर्यटकांनी व्यवस्थापनाविरोधात नाराजी व्यक्त केली. यासंदर्भात पाटणसावंगी पोलीस चौकी येथे पीडित परिवाराकडून तक्रार देण्यात आल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे खापा पोलीस आणि डायल 112 यांच्याशी संपर्क केल्यावरही त्यांच्याकडून काहीही मदत न मिळाल्यामुळे पीडित परिवाराने थेट पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्याकडे फोन करून मदत मागितली. विशेष म्हणजे गेले काही दिवस धनदांडग्यांची रेव्ह पार्टी प्रकरण, गोळी झाडून हत्या आणि आता द्वारका वॉटर पार्क येथे एका कुटुंबाला मारहाण केल्याप्रकरणामुळे खापा पोलीस स्टेशन चर्चेत आले आहे.