नागपूर : ट्रकवर कारवाई न करण्यासाठी लाच घेतल्याच्या आरोपाखाली ग्रामीण आरटीओ कार्यालयाशी संबंधित दलालाला हिंगोलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी रंगेहात पकडले. संजय पुरुषोत्तम कातुरे (वय ४३, रा. रतन हाइट्स, मेडिकल चौक) असे अटकेतील या दलालाचे नाव असून एका वाहतूकदाराच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.
या कारवाईमुळे प्रादेशिक परिवहन विभागात खळबळ माजली. मुळात आता हा आरोपी आरटीओतील कोणत्या अधिकाऱ्यासाठी लाच स्वीकारत होता, याचा तपास एसीबीने सुरू केला आहे. तक्रारदाराकडे दहापेक्षा अधिक ट्रक आणि इतर वाहने आहेत. या वाहनांवर संजय पुरुषोत्तम कातुरे (वय ४३, रा. रतन हाइट्स, मेडिकल चौक) असे अटकेतील या दलालाचे नाव असून एका वाहतूकदाराच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. त्याने १ लाख ६८ हजार रुपये दिल्यास वाहनांचे क्रमांक यादीत नमूद करून कारवाई न करण्याचे आश्वासन दिल्याचे वाहतूकदाराने तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, वाहतूकदाराने कातुरेच्या बँक खात्यात ऑनलाइन ५३ हजार रुपये जमा केले. त्यानंतर उर्वरित रकमेसाठी कातुरे तगादा लावत असल्याने त्याने मुख्यालयात तक्रार केली. रवींद्रकुमार सिंगल यांनी हिंगोली पथकाला कारवाईचे निर्देश दिले. गुरुवारी हे पथक नागपुरात दाखल झाले. ग्रामीण आरटीओ कार्यालयासमोरील कातुरेच्या कार्यालय परिसरात सापळा रचण्यात आला. वाहतूकदाराकडून ५० हजार रुपये स्वीकारताच पथकाने कातुरेला अटक केली.